यशवंतराव बाजी पासलकर
बाल शिवबा पुण्यात आले तेव्हा शहाजीराजांनी दिलेले अनेक मातब्बर, अनुभवी स्वराज्ययोद्धे त्यांच्यासोबत होते. पण त्यांना गरज होती ती पुणे भागातील मान्यवरांच्या पाठिंब्याची. नेमकी तीच गरज दूर केली ती बाजी पासलकर ह्यांनी!
बाजी पासलकर ह्यांच्याकडे ८४ गावांची देशमुखी होती. सुभ्यातील लोक त्यांना मानत ! त्यांच्या पाठिंब्यामुळे शिवरायांनी योजलेला स्वराज्यलढा सुरुवातीच्या काळात सुखकर होऊ शकला. अगदी रायरेश्वराच्या शपथेपासून ते पुरंदराच्या पहिल्या युद्धापर्यंत बाजींचे शिवरायांना पाठबळ मिळत राहिले.
पुरंदराच्या युद्धात ६५ वर्षांच्या बाजींनी लढता लढता समरांगणात स्वराज्यासाठी सर्वोच्च बलिदान केले