तान्हाजी मालुसरे
तान्हाजीराव म्हणजे शिवरायांचे अगदी लहानपणापासूनचे मित्र ! क्वचितच असे एखादे युद्ध असेल ज्यामध्ये तान्हाजीरावांचा सहभाग नाही. अगदी अफजल वधापासून, कोकण मोहिम असो, प्रचितगड जिंकून घेणे असो, मुघलांच्या जुन्नर ठाण्यांवर छापा असो, वा आग्याची महाराजांची भेट असो, साऱ्यांच मोहिमांत तान्हाजीराव कायम महाराजांसोबत होते.
पुरंदरचा तह तुटल्यावर जेव्हा सिंहगड घ्यायचा होता तेव्हा वैयक्तिक गरजांकडे दुर्लक्ष करत "सर्वप्रथम राष्ट्र !" असे पहिल्यांदाच सुचवत तान्हाजीरावांनी स्वराज्यासाठी सर्वो च बलिदान करत दुर्ग स्वराज्यात विलीन करून घेतला होता. तान्हाजीराव स्वतः एका भक्कम दुर्गासारखे असल्याचे गौरवोद्वार थेट शिवछत्रपतींनी काढले होते.