प्रस्तावना
स्वराज्याच्या यशासाठी शिवरायांना स्वराज्य संकल्पनेने प्रेरित आणि प्रसंगी कमालीचे शौर्य दाखवत लढू शकणाऱ्या योद्ध्यांची गरज होती. शिवरायांनी सामान्य लोकांमधून या योद्ध्यांना घडवले होते. महाराजांना त्यांचे अकल्पनीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मदत करणारे हे स्वराज्ययोद्धेच होते! ३५० वर्षांपूर्वी या स्वराज्ययोद्ध्यांनी अनेक अतुलनीय लढाया लढल्या आणि जिंकल्या.
आज आपण ते कसे दिसत होते याबद्दल अपरिचित आहोत! पण म्हणून आपण त्यांच्या. शौर्यगाथा आणि त्यांचे योगदान विस्मरणात जाऊ देता काम नये. तथापि, त्या सर्वांमध्ये आपल्या सगळ्यांचे अस्सल भारतीय सुपरहिरो बनण्याचे सर्व गुण आहेत. आणखी एक महत्त्वाची बाब अशी की ते सर्व आपल्या गौरवशाली इतिहासाचा एक भाग आहेत. या ऐतिहासिक पात्रांबद्दल इतिहासकारांनी जे काही लिहिले आहे, त्यास आधार बनवत आम्ही हे अवतार निर्माण केले आहेत. आम्हाला विश्वास आहे की या चित्रांच्या मदतीने आमच्या तरुण पिढीला त्यांच्यापासून प्रेरणा घेणे सोपे होईल !
Meet Swarajya Warriors
निरोप
आम्ही या गोष्टी लिहिताना, ही चित्रे बनवताना कमालीचे भारावून गेलो आहोत. आपल्या मावळ्यांच्या काही घटना तर अक्षरशः अविश्वसनीय वाटाव्या इतक्या भन्नाट आहेत! आपल्या मातीत जन्मलेले हे स्वराज्ययोद्धे आपल्या नव्या पिढीचे आणि आपलेही सुपरहिरोज् असायला हवेत.
ह्यांच्या प्रेरणादायी गोष्टी आपल्या लहानग्यांपर्यंत पोहोचायला हव्यात. तुम्हाला या चित्रांवरून, माहितीवरून काही अंशी त्यांना भेटण्याचा आनंद मिळाला असावा अशी आम्ही अपेक्षा करतो. आम्ही जाता-जाता सगळ्या शिवप्रेमींना वचन देतो की आम्ही या क्षेत्रात अजूनही दर्जेदार काम करीत राहू!