शिवाजी काशीद
पन्हाळ्याभोवतीचा सिद्दीचा वेढा पडून तब्बल ५ महिने झाले होते, वेढ्याचे स्वरूप अतिशय कडक असे होते, तो बाहेरून फोडणे आपल्याला जमले नव्हते. दुसरीकडे शाहिस्तेखानाने पुणे बळकावले होते. रयतेवर प्रचंड जुलूम होत होते. त्यामुळे महाराजांनी सिद्दीचा वेढा फोडून सुटून जाणे अपरिहार्य होते.
भर पावसात एकेदिवशी गडावरून दोन पालख्या उतरल्या. एकात स्वतः महाराज होते आणि दुसऱ्या पालखीमध्ये महाराजांच्या वेशात बसलेला वीर - शिवाजी काशीद! शत्रूच्या हाती सापडून आपणच शिवाजी असल्याचे सांगत ह्यांनी शेवटपर्यंत शत्रूला गाफील ठेवले.
शेवटी शत्रूच्या हाती सापडायचे आणि न लढताच मरायचे हे शिवाजी काशीद ह्यांना माहिती होते. महाराजांना विशाळगडापर्यंत पोहचण्यास वेळ मिळावा म्हणून शिवाजी काशिद ह्यांनी अपार धैर्याने मृत्यूस कवटाळले होते.