मुरारबाजी देशपांडे
मिर्झाराजांसोबत आलेल्या दिलेरखानाने जेव्हा ६०,००० चे सैन्य घेऊन पुरंदरला वेढा घातला तेव्हा मुरारबाजींच्या नेतृत्वात स्वराज्यसेनेने प्रचंड तिखट प्रतिकार केला होता. रात्री अपरात्री गडावरून आपल्या सैन्याच्या तुकडया मुघलांवर आक्रमण करीत होत्या. दिलेरखान निर्वाणीच्या हल्ल्याची योजना करणार इतक्यात दुर्गाचा दरवाजा उघडून मुरारबाजी आणि स्वराज्यसेना मुघल सैन्यावर चालून गेली. दुर्दैवाने यावेळी मुघलांचा एक बाण मुरारबाजींच्या वर्मी लागला. मुरारबाजींनी कमालीचे शौर्य दाखवत स्वराज्यासाठी सर्वोच्च बलिदान दिले.
फार आधी जावळीच्या चंद्ररावाला हरवल्यावर त्याच्याकडून लढणाऱ्या मुरारबाजींनी स्वराज्याचा उद्देश समजावून घेत स्वराज्यात पदार्पण केले होते. ते तेव्हापासून सारे आयुष्य स्वराज्याशी एकनिष्ठ राहिले.