मोरोपंत पिंगळे
राज्याभिषेकाच्या वेळी स्वराज्याचे पंतप्रधान नेमले गेलेले स्वराज्ययोद्धे म्हणजे मोरोपंत पिंगळे! वयाची १८ वर्षे त्यांनी हे पद भूषविले होते. त्या आधीही स्वराज्याच्या सगळ्या जमाखर्चाची जबाबदारी मोरोपंतांकडे होती. चोख प्रशासक तर ते होतेच पण मग ते लढायांना लागणारी रसद पुरवणे असो किंवा प्रतापगड बांधून काढणे असो वा शिवराज्याभिषेकासाठी रायगड सज्ज करणे असो, मोरोपंत बहुआयामी होते. ते एक कुशल योद्धेही होते.
स्वराज्याच्या अनेक मोहिमांचे नेतृत्व त्यांनी केले. अफजलखानाच्या सैन्यावर हल्ला, साल्हेरगडावरील विजय, शाहिस्तेखानावरील छापा, दिंडोरीची लढाई अशा अनेक मोहिमांत मोरोपंतांचा सहभाग होता.