मायनाक भंडारी
कोकण किनारपट्टीवर वेगाने हात पसरवणाऱ्या पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्दी ह्यांचा धोका स्वराज्यास आहे हे महाराजांच्या लक्षात आल्यावर स्वतःचे असे आरमार उभारण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. समुद्रावर जाऊन लढणारे दर्यावीर आपल्याला हवे होते. मायनाक भंडारी ह्यांनी नेमकी हीच उणीव भरून काढली.
त्यांच्यावरती खांदेरीच्या दुर्गाच्या बांधकामाची आणि संरक्षणाची जबाबदारी होती. आधी इंग्रजांचा आणि पुढे सिद्दिचा कडवा प्रतिकार मोडून काढत त्यांनी दिवसा युद्ध आणि रात्री बांधकाम अशी किमया करत शत्रूसमोर दुर्ग बांधून घेतला. त्यांनी छोट्या होड्या घेऊन इंग्रजांच्या भल्या मोठ्या युद्धनौकांशी दोन हात केले होते.