कान्होजी जेधे
शिवाजी महाराज जेव्हा स्वराज्यविस्तार करत होते तेव्हा महाराजांना मदत मिळावी म्हणून शहाजीराजेंनी कान्होजींना पाठवले होते. कान्होजींनी अनेक लढायांत शहाजीराजांना साथ दिली होती. स्वतः एक आदिलशाही वतनदार असून देखील त्यांनी जावळीवरील कारवाईत सक्रीय सहभाग घेतला होता.
पुढे अफझल स्वराज्यावर चालून आल्यावर ते स्वराज्यासाठी सर्वस्व त्यागण्यासाठी एका पायावर तयार होते. ते आणि त्यांचे सर्व कुटुंबीय मुले, नातू स्वराज्यासाठीच लढले. कान्होजींचे पुत्र, बाजी जेधे ह्यांनी पुरंदरच्या युद्धात कमालीचे शौर्य दाखवले होते आणि त्यांस महाराजांनी सर्जेराव किताब देऊ केला होता.