हंबीरराव मोहिते
स्वराज्याचे चौथे सरसेनापती हंबीरराव मोहिते होते. महाराजांची दुसरी पत्नी सोयराबाई ह्या हंबीररावांच्या बहीण होत्या. तसेच, स्वराज्याच्या रणधुरंदर महाराणी ताराराणी राजाराम - महाराजांच्या पत्नी हंबीररावांच्या कन्या होत्या. स्वराज्याच्या अनेक लढायांमध्ये हंबीरराव चमकले होते.
त्यांनी मुघल सरदार दिलेरखान आणि आदिलशहाचा सेनापती हुसेनखान मियाना ह्यांचा पराभव केला होता. बहादूरशहावरील त्यांच्या उत्कृष्ट विजयामुळे स्वराज्याला भरपूर खजिना मिळण्यास मदत झाली होती. जेव्हा संभाजीराजांऐवजी दरबारी लोक रामराजे ह्यांना गादीवर बसवण्याचा विचार करत होते; तेव्हा स्वतःचे जावई असलेल्या रामराजांना पाठिंबा देण्याऐवजी हंबीररावांनी स्वराज्यसेनेचे सारे बळ संभाजीराजांमागे लावले होते.
पुढे संभाजी महाराजांसाठी लढताना झालेल्या लढाईत हंबीररावांना वीरमरण आले होते.