google-site-verification=2eSrD4IMziwMlHreClZlqgzdjW2z1jaH8fxiTuuiNrU fbq('track', 'ViewContent');
top of page
Dauloji

दौलोजी

निष्ठा! मग ती राजावरची, राजांनी दिलेल्या संकल्पनेवरची किंवा राजांनी दाखवलेल्या स्वप्नांवरची असो, सगळ्याच मावळ्यांत ती ओतप्रेत भरून होती हे अनेक प्रसंगातून दिसून येते. असाच एक प्रसंग म्हणजे दौलोजींनी आदिलशाही गलबतांवर घातलेला छापा.

 

जेव्हा अफझल वाईकडून जावळीकडे महाराजांना भेटण्यास येत होता, तेव्हा युद्ध झाले तर महाराज कोकणच्या दिशेने पळून जातील म्हणून महाराजांची कोंडी करण्यासाठी अफझलाने गलबते भरून शस्त्रसाठा दंडाराजपुरी जवळील बेटावर ठेवला होता आणि ही माहिती आपल्या हेरखात्याकडून मिळताच महाराजांनी दौलोजींना, अफझलच्या भेटीच्या एक दिवस आधीच, या गलबतांवर छापा घालण्याच्या मोहिमेवर पाठिवले होते. दौलोजींनी हे काम तर पूर्ण केलेच, याशिवाय जवळच्या इंग्रजांच्या वखारींवर पण छापा मारला होता.

bottom of page