दौलत खान
स्वराज्यात अर्थार्जनासाठी स्वतःचे आरमार असणे आवश्यक आहे हे महाराजांच्या लक्षात आले होते. आपल्या कोकणात समुद्र माहीत असलेले खूप जण होते, पण समुद्रात जाऊन शत्रूशी चार हात करणारे मावळे स्वराज्याला हवे होते. नेमकी हीच उणीव भरून काढली दौलत खान ह्यांनी! हे नौदलाच्या अनेक लढायात सामील होते. व्यापारी जहाजांकडून करवसुली करण्यात तेच अग्रेसर असायचे. खांदेरी दुर्गाच्या बांधकामाच्या वेळेस, शत्रूमार्गातून, आपल्या नौका बांधण्याच्या ठाण्यावरून खांदेरीच्या बेटावर रसद पुरवण्याचे कठीण काम ह्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतले होते.
दौलत खान ह्यांनी मायनाक भंडारी ह्यांच्या सोबत छोट्या होड्या घेऊन इंग्रजांच्या भल्या मोठ्या युद्धनौकांना पळवून लावले होते. त्याचबरोबर समुद्रयुद्धात तरबेज असलेला सिद्दी देखील दौलत खान ह्यांच्या पुढे नामोहरम झाला होता.