दर्यासारंग
स्वराज्यविस्तार करत असताना, स्वराज्याला फक्त मुघल आणि आदिलशाह नाहीत तर कोकण किनारपट्टीवरील इंग्रज, पोर्तुगीजांचा पण धोका आहे हे महाराजांच्या लक्षात आले होते. कोकण स्वराज्यात आल्यावर व्यापाऱ्यांकडून कर वसूल करता येणे शक्य होणार होते. त्यामुळेच स्वराज्याला गरज होती ती स्वतःच्या आरमाराची. समुद्रात जाऊन शत्रूशी लढणारे मावळे महाराजांना हवे होते. आणि नेमकी हीच उणीव भरून काढली ती दर्यासारंग ह्यांनी!
नवे मावळे आरमारात आणणे, कर वसूल करताना रयतेला आणि सापडलेल्या व्यापाऱ्यांवर कोणताही अन्याय न होऊ देणे, या जबाबदाऱ्या त्यांनी चोख पार पाडल्या होत्या. महाराजांनी त्यांस आरमाराचा प्रमुख म्हणून नेमले होते. नौदलाच्या अनेक मोहिमांत ह्यांचा मोलाचा हातभार लाभला होता.