शिवचरित्र चित्रोत्सव 2025
शिवछत्रपती म्हणजे वैश्विक चारित्र्याचे महानायक! त्यांनी साधलेल्या स्वराज्यलढ्याच्या महासंग्रामात अनेक प्रसंग कमालीचे प्रेरणादायी आहेत. काही सर्वश्रुत आहेत तर काही अजूनही म्हणावे तितके प्रकाशझोतात आलेले नाही. आम्ही 'मावळा' आणि 'खुला आसमान' वतीने शिवचरित्रातील फारशा ऐकल्या न गेलेल्या भन्नाट शौर्यगाथांना प्रकाश झोतात आणण्याचा उद्देशाने एका अभिनव उपक्रमाचे आयोजन करत आहोत.
आपल्या मधल्या चित्रकाराला आव्हान देत चला साकारू एक आगळावेगळा चित्रोत्सव.. शिवचरित्र चित्रोत्सव.
शिवछत्रपतींसाठी लढलेल्या स्वॉरियर्सच्या म्हणजे स्वराज्ययोद्धयांच्या आयुष्यातील काही प्रसंगांच्या गोष्टी जर त्यांनी स्वतः आपल्याला सांगितल्या तर ते त्या कशा सांगतील? या विचारांतून आम्ही काही SWARRIORS' STORIES आपणापुढे आणत आहोत. त्यातील तुम्हाला आवडेल त्या गोष्टीला मध्यवर्ती मानून आपण एक कल्पनाचित्र साकारायचे आहे.
श्राव्य स्वरूपात भिडणाऱ्या गोष्टी प्रत्येकाच्या मनात अगदी निरनिराळ्या पद्धतीने अवतरत असतात. नेमक्या त्याच आपण साऱ्यांनी कागदावर उतरवल्या तर यंदाच्या शिवजन्मोत्सवादिवशी आपल्या साऱ्यांच्या मनांतुन साकारले गेलेले एक आगळे वेगळे शिवचरित्र या चित्रोत्सवातून साधायचा आमचा मानस आहे.
शिवछत्रपतींचे स्मरण करून त्यांच्यासाठी लढलेल्या आपल्या अस्सल भारतीय सुपरहिरोजच्या - स्वॉरियर्सच्या - म्हणजे अहो आपल्या स्वराज्ययोद्धांच्या शौर्यगाथा ऐका. तुमच्या मनाला भावेल ती निवडा आणि आकार द्या तुमच्या स्वतःच्या अशा मननचित्राला!
तुमचे चित्र आम्हाला पाठवून या मोहिमेचा भाग बना!
शिवछत्रपतींना मानवंदना देणाऱ्या या आगळ्यावेगळ्या शिवचरित्र चित्रोत्सवामध्ये सहभागी व्हा!