बाजीप्रभू देशपांडे
बाजीप्रभू म्हणजे आपल्या राजाच्या सुरक्षिततेसाठी प्राण पणाला लावून शत्रूशी लढलेले स्वराज्ययोद्धे ! महाराज सिद्दीच्या वेढ्यातून सुटून विशाळगडावर जात असताना, पाठलाग करणाऱ्या मसूदच्या सैन्याला ह्यांनी अडवले होते.
महाराज सुखरूप विशाळगडावर पोहोचेपर्यंत, सलग २० तास, बाजी आणि ३००चे बांदलसैन्य, १० हजाराच्या शत्रूसैन्याशी लढले होते. त्यांचा मागे थांबण्याचा निर्णय हाच मुळी त्यांच्या आणि त्यांच्या सैन्याच्या पुढे होणाऱ्या मृत्यूवर शिक्कामोर्तब करणारा होता. पण याच एका पद्धतीने महाराजांच्या सुरक्षिततेची शक्यता होती.
बाजींच्या आणि त्यांच्या सैन्याच्या या बलिदानानंतर त्यांच्या रक्ताने पावन झालेल्या घोडखिंडीला आता आपण 'पावनखिंड' म्हणून ओळखतो!