बहिर्जी नाईक
महाराज दुर्गनिर्मिती व्यतिरिक्त सळ्यात जास्त जर कशावर खर्च करत असतील तर ते म्हणजे आपल्या हेरखात्यावर!
बहिर्जी नाईक जाधव म्हणजे या गुप्तहेर खात्याचे प्रमुख ! मुघल ठाण्यांवर छापे मारण्याची योग्य वेळ असो किंवा अफझलखान कोणकोणत्या मार्गाने येणार आहे? याची माहिती असो, सिद्दीच्या वेढ्यातून सुटल्यावर विशाळगडावर पोहचण्यासाठीचा नेमका मार्ग असो किंवा सुरतेच्या छाप्याच्या वेळी व्यापाऱ्यांकडे असलेल्या संपत्तीची माहिती असो, सारी महत्त्वाची माहिती स्वराज्यात अचूक आणण्याचे श्रेय बहिर्जी नाईक जाधव ह्या स्वराज्ययोध्याला जाते आणि त्यामुळेच थेट लढाईत सहभाग नसला तरी बहिजींनी अप्रत्यक्षरीत्या स्वराज्याला अनेक लढाया जिंकून दिल्या होत्या! स्वराज्याच्या जवळ जवळ सगळ्याच लढायांत बहिजींचे योगदान अमूल्य होते.